दिव्यातील विशाल जुन्नर पतपेढीचा ७ वर्धापनदिन उत्साहात संपन्न.
दिव्यातील विशाल जुन्नर पतपेढीचा ७ वर्धापनदिन उत्साहात संपन्न.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ३१ ऑक्टो : दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनी येथील विशाल जुन्नर सहकारी पतपेढीचा ७ वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला. विशाल जुन्नर सहकारी पतपेढीची ही ३२ वी शाखा असून सदर पतपेढीचे संपूर्ण महाराष्ट्रात जाळे पसरले आहे. संचालक बजरंगशेठ शेळके यांच्या उपस्थितीत सदर शाखेत दीप प्रज्वलन करून अनेक मान्यवरांच्या उपस्थित वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
विशाल जुन्नर सहकारी पतपेढीच्या राज्यात एकूण ४१ शाखा असून एकूण भागभांडवल १३७१ कोटी आहे. सदर पतपेढीचे एकूण ८५,३८४ सभासद असून लेखा परीक्षणात नेहमी “अ” वर्ग मिळविण्यात यशस्वी ठरली आहे. प्रसंगी दिवा शाखा अधिकारी सुषमा निमसे, साईनाथ नवले, ऋषिकेश काशीद यांच्यासह अनेक सभासद हजर होते. सदर शाखेच्या दिवा वतीने अनेक सुविधा उपलब्ध असून या सुविधांचा लाभ घेण्यासाठी शाखा अधिकारी सुषमा निमसे यांनी केले असून अधिक माहितीसाठी ७७३८५७४११९ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.