दिवा पश्चिमेतील समितीच्या मालमत्ता कर विभागातील दुरावस्था.
दिवा पश्चिमेतील समितीच्या मालमत्ता कर विभागातील दुरावस्था.
ऍड. रविराज बोटले यांचे सहायक आयुक्तांना पत्र
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ७ नोव्हे : दिवा पश्चिमेतील ठाणे महानगर पालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या मालमत्ता कर विभागातील इमारती मधील रूमची दुरावस्था उघडकीस आली आहे. दिवा शहरातील मालमत्ता कर विभाग कोटींच्या घरात कर जमा केला जातो त्याच इमारतीत अधिकारी, कर्मचारी तसेच मालमत्ता कर ग्राहक ये-जा करत असतात सदर कार्यालयातील दुरावस्थेमुळे कर्मचाऱ्यांना आपला जीव मुठीत ठेऊन काम करावे लागत आहे. मालमत्ता कर विभागाची अनेक महत्वाची कागदपत्रे व फाईल असणाऱ्या रूम मधील पोटमाळा धोकादायक स्थितीत असून त्याला कश्या प्रकारे आधार देण्यात आला असल्याचे निदर्शनास आल्याने एडवोकेट रविराज बोटले यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
प्रकरणी दिवा प्रभाग समितीच्या मालमत्ता कर विभागातील इमारती मधील रूमची दुरावस्था तात्काळ दूर करण्यासाठी व मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी दिवा प्रभाग समितीच्या मुख्य कार्यालयातील सहायक आयुक्त यांना एखादी दुर्दैवी दुर्घटना घडू नये म्हणून कार्यालयात संरचनात्मक सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.