भास्कर दिसले यांच्या प्रवेशाने पाथरज जिल्हा परिषद वार्डमध्ये महेंद्र थोरवे यांची ताकद वाढली.

0

 

कर्जत : सुमित क्षिरसागर

ता ८ नोव्हेंबर २०२४

“सदैव जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेतृत्व आणि माझे मित्र श्री. भास्कर दिसले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.” – आमदार श्री. महेंद्र थोरवे

आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत पाथरज जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस गटातील श्री भास्कर दिसले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी गुरुवारी शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला.

पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी विविध गावांमधून कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये
ताडवाडी: श्री. शशिकांत आगिवले आणि त्यांचे कार्यकर्ते
मोरेवाडी: श्री. रवींद्र केवारी आणि कार्यकर्ते
कवठेवाडी: श्री. कृष्णा वाघ आणि कार्यकर्ते
खोडेवाडी: श्री. वामन पाटील आणि कार्यकर्ते
खांदण: श्री. वसंत केवारी आणि कार्यकर्ते
मेचकरवाडी: श्री. लक्ष्मण मेंगा आणि कार्यकर्ते
अंजप: श्री. वासुदेव जोंगले आणि कार्यकर्ते
ग्रामपंचायत मोग्रज: श्री. भरत भाऊ शीद, श्री. विलास भला, श्री. शिवाजी सांबरे, श्री. प्रकाश थोरात आणि त्यांचे कार्यकर्ते
चौधरीवाडी: श्री. उत्तम दोरे आणि कार्यकर्ते
पिंगळस: श्री. सुरेश दिसले आणि कार्यकर्ते
भल्लाचीवाडी: श्री. रामदास भल्ला आणि कार्यकर्ते
कामत पाडा: श्री. संभाजी बांगर आणि कार्यकर्ते
वारे ग्रामपंचायत: श्री. सागर म्हसे आणि कार्यकर्ते
नेरळ: ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. मनोहर हजारे आणि कार्यकर्ते
नालधे: श्री. दत्तात्रय म्हसे आणि कार्यकर्ते
पिंगळेवाडी सुगवे येथील ग्रामस्थांनी,
अत्करगाव (जखमवाडी) येथील ग्रामस्थांनी,
ग्रुप ग्रामपंचायत कुंभीवली येथील मौजे धामणी येथील उ.बा.ठा गटातील कार्यकर्त्यांनी,
कुंभिवली येथील ग्रामस्थ मा. सरपंच अनिल म्हामुणकर (शिवसेना वाहतूक तालुका अध्यक्ष खालापूर उ.बा.ठा.) यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी,
नालधेवाडी येथील ग्रामस्थांनी
शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून, या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवरील पक्षाची ताकद आणि जनाधारात भर पडली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!