शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेतेपदी प्रकाश पाटील यांची नियुक्ती.
संतोष पडवळ,
-
ठाणे, ता. ११ :
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात शिवसैनिकांचे जाळे निर्माण करणे, शिवसेना पक्ष त्यांची कार्यपद्धती तळागाळात पोहोचविण्याबरोबरच शिवसैनिकांसाठी कायम मदतीचा हात देणे आदी विविध केलेल्या कामांची पोचपावती म्हणून शिवसेनेचे पक्षाचे मुख्यानेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतेपदी प्रकाश पाटील यांची नियुक्ती केली. त्यांच्या या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.
ठाणे जिल्ह्यात धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील यांनी शिवसेनेच भगवा झेंडा खांद्यावर घेवून कामाला सुरुवात केली. जिल्हाप्रमुख आनंद दिघे असतांना ते शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. निष्ठावंत शिवसैनिकापासून शाखाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख व २० वर्षापासून शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख पदावर कार्यरत होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड केली होती. ठाणे जिल्हा परिषदेमध्ये ७ वर्ष गटनेतेपद हि पाटील यांनी भूषविले. जिल्ह्यातील खेड्यापाड्यात पक्ष संघटना वाढविण्याचे काम त्यांनी केले. तसेच तळागाळातील शिवसैनिकांसाठी कायम मदतीचा हात देत असल्याने असंख्य शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.
…………………………….
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवुन माझ्यावर पक्षाची मोठी जबाबदारी टाकली असून, ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पक्षाची ध्येय धोरणे राबविण्यासाठी व पक्षवढीसाठी पार पाडील असे यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नेते प्रकाश पाटील यांनी सांगितले.