अपुऱ्या आरोग्य सेवा व रखडलेल्या सुविधांसाठी वंचित शिवाय पर्याय नाही – विकास प्रकाश इंगळे.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १७ नोव्हें : अपुऱ्या आरोग्य सेवा व रखडलेल्या सुविधांसाठी वंचितला पर्याय नाही असे कल्याण ग्रामीण विधानसभा उमेदवार विकास प्रकाश इंगळे यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण ग्रामीण विधानसभेच्या चुरशीच्या लढतीत 2019 प्रमाणे किंग मेकर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असणार.
2019 मध्ये झालेल्या विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अमोल धनराज केंद्रे यांनी 6200 मते घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा अवघ्या 5300 मतांनी पराभव होवून मनसे चे राजू पाटील आमदार म्हणून निवडून आले असे विकास प्रकाश इंगळे यांनी पत्रकारांना प्रतीक्रिया दिली आहे.
दिवा शहरातील विकास कामांच्याकडे मनसेने लक्ष न दिल्याने त्यांच्या विषयी दिवा शहरातील जनते मध्ये नाराजी आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे सुभाष भोईर व शिंदे गटातून राजेश मोरे लढत आहेत. सुभाष भोईर हे स्थानिक म्हणून प्रचार करत असले तरी त्यांच्या विषयी सुद्धा दिवा शहरात नाराजी आहे. तर शिंदे गटाचे राजेश मोरे यांना तिकीट दिल्याने शिंदे गटातील पदाधिकारी यांचा मनसेचे राजू पाटील तर काहींचा सुभाष भोईर यांना पाठिंबा असल्याची दिवा शहरात चर्चा आहे. त्यामुळे मतदार ही संभ्रमात आहेत. त्यातच दिवा शहरातील भाजपा ही सुद्धा नाराज असल्याचे बोलले जात आहे. आपला खासदार नाही, आमदार नाही तर आपला नगरसेवक नाही आणखी किती दिवस युती धर्म म्हणून यांच्या पाठी मिरवत राहायचे. आपलेही अस्तित्व आहे की नाही! की फक्त आपण झेंडेच घेत फिरायचे अशी चर्चा सुरू असल्याचे इंगळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे भाजपचे मतदार आणि पदाधिकारी सुद्धा प्रचार करताना फारसे दिसत नाहीत. सद्याचे वातावरण पाहिले 2014 पासून दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू होण्याच्या 7 दिवसाच्या आमरण उपोषण वेळी शिवसेना, मनसे, उभाठा गटातील नेत्यांनी भेट सुद्धा दिली नसल्याने दिवा शहरातील सामान्य जनता नाराज आहे. त्यामुळेच तर मतदारांची मन धरणी करण्यासाठी प्रत्त्येक पक्षाचा नेता आम्ही दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू करण्याचे आश्वासन देत आहे. हे जनतेला कळून चुकले आहे. दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू होण्याच्या प्रतीक्षेत जीव मुठीत धरून लटकून प्रवास करणारे नागरिक आणि टोरंट चे वाढते बिल, पाणी समस्या, आरोग्य समस्या याला जनता कंटाळली असून याचाही प्रभाव पडून मतदार मताचे परिवर्तन झाले असून मतदारांचा कल आत्ता वंचित बहुजन आघाडीतून निवडणूक लढत असलेले जनसामान्यात वावरणारे आपल्यातले एक असे विकास इंगळे यांच्या कडे असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दिवा शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांचा आम्हांला छुपा पाठिंबा असल्याचे इंगळे यांनी सांगितले. त्यामुळे या तिघांच्या भांडणात वंचित बाजी मारू शकते.