दिव्यातील प्रथमेश क्लासेसचा बक्षीस वितरण सोहळा मोठया उत्साहात संपन्न
ठाणे, दिवा ता २१ नोव्हेंबर
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे : दिव्यातील प्रथमेश क्लासेसचा बक्षीस वितरण बी आर नगर येथील स्पोर्ट्स टर्फ येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. प्रसंगी पारंपरिक वेशभूषा तसेच गरबा आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये मुलानी वरचढ असा भाग घेऊन देशातील वेगवेगळ्या प्रांताचा वेशभूषा केल्या होत्या तसेच या कार्यक्रमा अंतर्गत क्रिकेट, खोखो, रांगोळी, मेहंदी, चेस, कॅरम, चित्रकला तसेच पाककला झालेल्या विविध स्पर्धांचे वितरण क्लासेसचे संचालक नितीन पाटील व इतर मान्यवारांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.