नेरळमध्ये निकालाच्या पूर्वीच महेंद्र थोरवे यांच्या विजयाचे बॅनर झळकले.
खबर पक्की…. विजय नक्की…
मतमोजणी आधीच थोरवेंचा विजयाचे बॅनर….
नेरळमध्ये निकालाच्या पूर्वीच महेंद्र थोरवे यांच्या विजयाचे बॅनर झळकले.
नेरळ: सुमित क्षिरसागर
विधानसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर असताना नेरळ मध्ये शिवसैनिकांनी महेंद्र थोरवे यांच्या विजयाचे बॅनर लावले गेले आहेत.
राज्यात विधानसभेची निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना महाराष्ट्रात एक्झिट पोलनी आपल्या सर्व्हे नुसार कोणत्या मतदार संघात कोन विजयी होईल याच गणित मांडायला सुरुवात केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास शिल्लक आहेत. मात्र निकाल लागण्या आधीच कार्यकर्ते मात्र उत्साहात आहेत. त्यांनी आपल्या नेत्याचा विजय नक्की होणार हे गृहीत धरले आहे. त्यातून अनेक ठिकाणी आमदार म्हणून बॅनरही झळकले आहेत. असाच एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तो म्हणजे शिवसेनेचे कर्जत खालापूरचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा नवनिर्वाचित आमदार असा उल्लेख करण्यात आला आहे.
शुभेच्छुक म्हणून शिवसैनिक विशाल साळुंखे ,प्रमोद कराळे, देवेंद्र दाभणे यांनी महेंद्र थोरवे यांना शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.
महेंद्र थोरवे यांच्या अभिनंदनाचे बॅनर मतदार संघात लागले आहे. त्यावरचा मजकूरही सर्वांचे लक्ष वेधत आहे. खबर पक्की विजय नक्की असं लिहीलं आहे. शिवाय 4040 पुन्हा असा मजकूर लिहण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील कर्जत कल्याण राज्य महामार्गालगत असलेल्या नेरळ गावात हे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या मतदार संघात महेंद्र थोरवे विरुद्ध सुधाकर घारे आणि नितीन सावंत अशी तिरंगी लढत होत आहे. या ठिकाणी लढत ही कमालीची चुरशीची होत आहे. या लढतीत कोण विजयी होणार हे आताच सांगता येत नाही. त्यामुळे वेगवेगळे आंदाज व्यक्त केले जात आहेत.