गणेशखिंडीत पिकअपचा गाडीचा आपघात होऊन 15 जण जखमी
जुन्नर (पुणे) ता 18 मे : जुन्नर – मढ रस्त्यावरील गणेशखिंड येथे आज दुपारी एका पिकप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 15 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. या आठ दिवसातील हा दुसरा अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील शिनोली गंगापुर येथून MH. 14. AZ. 3965 या क्रमांकाची पिकप गाडी सरळगाव मुरबाड या ठिकाणी लग्नासाठी जात असताना पलटी झाली. या अपघातात 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून जखमींना आळेफाटा तसेच जुन्नर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.