दिवा-खर्डी येथे लागलेली भीषण आग आटोक्यात आनण्यास अग्निशमन दलाला यश
ठाणे, दिवा (संतोष पडवळ )
आज दिनांक २४/११/२०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार सुदामा रेसिडेन्सी जवळ, खर्डी गाव, दिवा. या ठिकाणी कचऱ्याला आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-हायराईज फायर वाहनासह व ०१-रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी कचऱ्याला लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पुर्णपणे विझविण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.