⭕️दिव्यातील नववधूची लग्नमंडपात बैलगाड्यावर दमदार एंट्री !
ठाणे, दिवा, ता 18 मे : दिव्यातील नववधूची लग्नमंडपात बैलगाड्यावर दमदार एंट्री झाल्याने सर्व पाव्हणे मंडळीच्या भुवया उंचावल्याचे आढळून आले आहे. दिव्यातील दातीवली भागातील श्री सुनील हरी पाटील यांची मुलगी हेमांगी हिचा विवाह अक्षय म्हात्रे यांच्याबरोबर नुकताच पार पडला प्रसंगी श्री सुनील पाटील व भाऊ अनिल पाटील यांना बैलगाड्याचा शौक असल्यामुळे यांनी ऐक भन्नाट कल्पना सुचली व त्यानुसार सदर विवाह सोहळ्या प्रसंगी नववधूचे लग्नमंडपात डोली किंवा इतर आगमन न होता बैलगाड्यावर (छकडा) आगमन झाल्याचे पहlवयास मिळाले प्रसंगी सदर विवाहाला शेकडो पाव्हणे मंडळी उपस्थित असल्याने सदर प्रवेशाप्रसंगी सर्वाना आश्चर्य व नवल वाटावे असा प्रवेश झाल्याने सर्वाना सुखद धक्का पहावयास मिळाला.