ठाण्यात रविवारी रंगणार एवा एंटरटेन्मेंट प्रस्तुत फॅशन आयकॉन स्पर्धा.
![](https://shivnerinews.in/wp-content/uploads/2024/12/IMG-20241130-WA0081-1024x614.jpg)
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे,ता.३० नोव्हें : सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहरातील तीनहात नाका येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहे ब ठाकरे स्मारक सभागृहात रविवारी फॅशन आयकॉन स्पर्धा आयोजित केली आहे. ठाण्यातील एवा एंटरटेनमेंट द्वारे आयोजित केलेल्या या स्पर्धेत पाच वर्षीय बालकांपासुन ८० वर्ष वयोगटातील तब्बल ५० हुन अधिक स्पर्धक सहभागी होणार असुन स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना क्राऊन तसेच सोन्याची नथ व अन्य व्यक्तीमत्व विशेष प्राविण्य स्पर्धकांना भरघोस पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. एवा एंटरटेन्मेंटच्या मिसेस विजया शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी क्वीन ऑफ मुंबई गौरी सावंत, लावणी सम्राट अश्मीक कामठे,अभिषेक राणे तसेच सचिन भोसले उपस्थित होते.
मनोरंजन क्षेत्रात होतकरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यात अग्रेसर असलेल्या एवा एंटरटेनमेंटच्या पाचव्या सत्रात फॅशन आयकॉन – २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ठाण्यात होत असलेल्या या स्पर्धेत किडस, टीन एज, मिस्टर, मिस , मिसेस आणि क्लासिक गटात ५० प्लस वयोगटातील ५० स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना क्राऊन, ट्रॉफी व सोन्याची नथ प्रदान करण्यात येणार असुन टायटल सॅशमध्ये व्यक्तीमत्व विशेष प्राविण्य दर्शवणाऱ्या स्पर्धकांना वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. यात गिफ्ट व्हाऊचर्स , पु.ना. गाडगीळ (पीएनजी) कडून ज्वेलरी फोटोशुटची संधी उपलब्ध असणार आहे. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणुन बिगबॉस फेम मिस्टर इंडीया डॉ. रोहित शिंदे,मराठी अभिनेत्री मॉडेल हिना सय्यद, ट्रेनर आणि ग्रुमर अवी पायल, कॉस्चुम डिझायनर मंदार तांडेल हे असुन या स्पर्धेत लावणी सम्राट अश्मीक कामठे, क्रेझी फुडी रंजिता विशेष अतिथी आहेत. तरी, ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहावे. असे आवाहन कार्यक्रमाच्या ग्रुमिंग गौरी सावंत यांनी केले आहे.