दिव्याजवळील शिळफाटा येथील फर्निचर गोडाऊन जळून खाक.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा : ता ०३/१२/२०२४ रोजी ४:१५ वाजताच्या सुमारास मे. प्रकाश एम.एस. वर्क्स, इब्रार अहमद जनरल स्टोअर जवळ, युनिक अपार्टमेंट समोर, मुंब्रा-शीळ रोड, शिळफाटा, ठाणे. या ठिकाणी मे. प्रकाश एम.एस. वर्क्स (मालक – श्री. मनोज कुमार, गोडाऊन – १२०० स्क्वेअर फुट) या गोडाऊनला आग लागली होती.
सदर घटनास्थळी डायघर पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०२-फायर वाहनासह, ०१- रेस्क्यू वाहनासह, ०१- वॉटर टँकर वाहनासह व टोरंट पॉवर विद्युत कर्मचारी उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. सदर आग लागलेल्या गोडाऊन मधील सोफा, कपाट, बेड इतर साहित्य जळाल्याने नुकसान झाले आहे. घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून ५ :४८ वाजताच्या सुमारास पूर्णपणे विझविण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.