लोकप्रिय कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता !
मुंबई ता ३ डिसें : लोकप्रिय कॉमेडियन सुनील पाल यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. १ डिसेंबर रोजी ते घराबाहेर पडले होते आणि अजूनपर्यंत ते परत आलेले नाहीत. त्यांच्या पत्नीने दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या पत्नी सरिता पाल यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.