ब्रेकिंग : आंबिवली रेल्वे स्थानकात इराणी टोळक्यांकडून पोलिसांवर तुफान दगडफेक दोन पोलीस जबर जखमी.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता ५ डिसें : आंबिवली रेल्वे स्थानकात इराणी टोळक्यांकडून पोलिसांवर तुफान दगडफेक दोन पोलीस जबर जखमी झाले असून पोलिसांचा स्टेशन परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी पकडलेला आरोपी सोडविण्याच्या उद्देशाने सदर दगडफेक दि. 4 डिसेंबर रोजी रात्री 9:45 वाजता झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.