हेल्मेट घातले तरीही लागणार 2 हजार रुपये दंड ; जाणून घ्या वाहतूक विभागाचे नवे नियम !
मुंबई, ता 19 मे (प्रतिनिधी) : दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक असते. मात्र तरिही अनेकजण विनाहेल्मेट दुचाकी चालवतात. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु, आता हेल्मेट घातले असले, तरी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ऐकून नवल वाटलं असेल, पण होय हे खरंय, यापुढे दुचाकी चालवताना हेल्मेट घातलेय आणि त्याची स्ट्रिप लावली नसेल तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार, दुचाकी चालवताना हेल्मेट घातले आहे, पण हेल्मेटची स्ट्रिप लावली नसेल, तर 1000 रुपयांचे चलान कापल जाऊ शकते. तसेच, आपण सदोष हेल्मेट म्हणजेच BIS नसलेले हेल्मेट घातले असल्यास 1000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. नियम 194D MVA नुसार ही दंडात्मक कारावई केली जाणार आहे. त्यानुसार एकूण 2000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. त्यामुळे आता दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारच असेल, शिवाय हेल्मेटची स्ट्रिप लावणेही आवश्यक असणार आहे.
नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, आपले वाहन ओव्हरलोडेड असेल तर, आपल्याला 20,000 रुपये एवढा जबरदस्त दंडही होऊ शकतो. याशिवाय असे केल्यास आपल्याला प्रति टन 2000 रुपयांचा अतिरिक्त दंडही द्यावा लागू शकतो.