दिवा शहर वंचित बहुजन आघाडीचे श्री विकास इंगळे यांसकडून दादर चैत्यभूमीवर भिम अनुयायांना बिस्कीट वाटप..
संतोष पडवळ – प्रतिनिधी
मुंबई ता ६ डिसेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या “महापरिनिर्वाण दिनानिमित्त” महामानवाला आदरांजली, अभिवादन करून दिवा शहर वंचित बहुजन आघाडीचे विकास इंगळे यांनी समाज बांधवाना बिस्कीट वाटप केले. खऱ्या अर्थाने महामानवाला आदरांजली म्हणजे समाजकार्य होय अशीच समाजसेवा प्रत्येक वेळेला मी करत राहीन असे विकास इंगळे यांनी त्यावेळी स्पष्ट केले.
प्रसंगी दादर चैत्यभूमी येथे गणेश पवार, नितीन अहिरे, प्रवीण अहिरे, नितीन आवाडे, चेतन पेंढारकर, मोहित मुरुडकर, चंद्रसेन जाधव, प्रमोद खांबे, देवेंद्र कांबळे, अविनाश कदम, नितीन जाधव, सुनील जाधव, सुनील सरदार आदी मान्यवर उपस्थित होते.