भारतीय मराठा संघाचा दिनदर्शिका २०२५ प्रकाशन सोहळा ऊत्साहात संपन्न.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ८ डिसें : भारतीय मराठा संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने दिवा शहरातील शिवम प्लाझा सभागृह, मुंब्रादेवी कॉलनी येथे दिनदर्शिका 2025 प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भारतीय मराठा संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अविनाश पवार, उपाध्यक्ष दीपक पालांडे, सचिव महेश महापदी, एस डी पाटील (आर्किटेक), खजीनदार अजीत जाधव, महिला उपाध्यक्षा अनघा जाधव, सचिव सुनिता गव्हाणे, ठाणे महानगर व रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण फणसे, ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, ठाणे शहर अध्यक्ष उमेश गोगावले, रायगड जिल्हा उपाध्यक्ष निमिष विश्वासराव, उल्हासनगर शहर अध्यक्ष सुनील साळुंखे, नवी मुंबई शहर अध्यक्ष विजय कदम, कल्याण (प.)शहर अध्यक्षा सुरेखा जरांगे पाटील, उल्हासनगर महिला शहर अध्यक्षा संजीवनी जगताप, विमल गाडे, नाना उतेकर, राकेश मोरे, देवेंद्र पाणकर, कृष्णा शिगवण, ठाणे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख संतोष पडवळ व अमित जाधव आदी उपस्थित होते.
प्रसंगी सदर कार्यक्रमात एस डी पाटील यांचे महीला सक्षमी करणाकरीता तसेच मिलींदजी भोसले यांनी कौशल्य विकास या विषयावर मार्गदर्शन केले तर अध्यक्ष अविनाश पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भारतीय मराठा संघ हा क्रांती मोर्चाच्या आधिपासुन आरक्षण तसेच विविध मराठा समाजाकरिता आजवर सक्रीय असुन मराठा समाजाकरीता न्याय हक्कासाठी भांडणारी संघटना आहे याची जाणिव करुन दिली, तसेच सर्वानी संघटनेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले. प्रसंगी अनेक पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. कायक्रमाचे सूत्र संचालन महेश महापदी व आभार अरुण फणसे यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.