दिव्यात कोकण क्रांती गणेशपाडा आयोजित भव्य कब्बड्डी स्पर्धा संपन्न.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ९ डिसें : दिव्यात कोकण क्रांती (गणेशपाडा) मंडळाच्या वतीने भव्य दोन दिवशीय कब्बड्डी सामने आयोजित करण्यात आले होते सदर स्पर्धेचे उदघाट्न दिवा पोलीस चौकीचे सपोनि. अमोल कोळेकर व पोउनि. सावंत व मंडळाचे अध्यक्ष संतोष आदावडे, मनोहर झुजम, दिनेश थरवळ, प्रवीण बोभाटे याच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक – नवकुमार कर्जत, द्वितीय क्र – साई श्रध्दा स्पोर्ट्स क्लब दिवा तृतीय क्र. श्री संदीप अनंतराव शिर्के युवा फाउंडेशन. चतृर्थ क्र.स्वप्नपुर्ती कुडगाव विजेते झाले. सदर दोन दिवशीय कबड्डी स्पर्धेत अनेक टीमने सहभाग नोंदवला.
सदर स्पर्धा दिव्यातील गणेशपाडा येथे शनिवार व रविवारी पार पडली. स्पर्धेचे बक्षीस वितरण रमाकांत मढवी (माजी उप महापौर). सौ. दर्शना म्हात्रे (नगरसेविका.) चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, जगदीश भंडारी, संतोष देसाई व मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष आदावडे व कमिटी यांच्या हस्ते करण्यात आले.