स्वातंत्र्य सेनानी नानासाहेब पेशवे यांचे राष्ट्रीय स्मारक वेणगाव या ठिकाणी उभारणार – आमदार महेंद्र थोरवे

0

कर्जत: सुमित क्षिरसागर

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि १८५७ चे स्वातंत्र्य सेनानी नानासाहेब पेशवे स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नानासाहेब पेशवे यांच्या २०० व्या जयंती सोहळा रविवार, ८ डिसेंबर २०२४ रोजी, महालक्ष्मी देवस्थान मु. वेणगाव,कर्जत या ठिकाणी ट्रस्टच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते मा. अविनाश धर्माधिकारी (माजी सनदी अधिकारी) नानासाहेब पेशवे यांच्या गावी आल्यानंतर या ठिकाणाच्या हवेतून अतिशय चांगली स्पंदने निर्माण होतात नानासाहेब पेशवे यांनी आपल्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी खूप मोठे योगदान दिले ते शेवटपर्यंत इंग्रजांच्या हातामध्ये सापडले नाहीत त्यांनी केलेले हे महान योगदान आपल्या सर्वांना वेगवेगळ्या मार्गाने पुढे घेऊन जायचे आहे हीच त्यांच्या कार्याची प्रेरणा ठरेल.

कार्यक्रम प्रसंगी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री प्रशांत ठाकूर यांनी नानासाहेब पेशवे यांचे 1857 स्वातंत्र्य लढ्यातील योगदान खूप महत्त्वाचे आहे अशी भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्मभूमी म्हणून रायगड कडे बघितले जाते याच रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर तालुक्यामध्ये अनेक रत्ने जन्माला आले यामध्ये हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील व वेनगाव येथे जन्मलेले नानासाहेब पेशवे हे एक आहेत.1857 च्या उठावामध्ये नानासाहेब पेशवे यांचे मोलाचे योगदान होते त्यांनी संपूर्ण भारतभर हा उठाव केला हा उठाव जर चांगल्या प्रकारे यशस्वी झाला असता तर भारताला 1857 च स्वातंत्र्य मिळाले असते नानासाहेब पेशवे हे या भूमीचे सुपुत्र आहे याचा आम्हा कर्जतकरांना अभिमान आहे. नानासाहेब पेशवे यांचे राष्ट्रीय स्मारक वेणगाव या ठिकाणी उभारले जाईल व यासाठी आवश्यक असलेला सर्व खर्च राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असा शब्द दिला. तसेच या राष्ट्रीय स्मारकासाठी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून 3 ते 5 एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल.
कर्जत तालुका हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला तालुका आहे. कर्जत तालुक्याला जागतिक पर्यटन बनवण्यासाठी आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक स्मारके या ठिकाणी निर्माण केलेली आहेत. यामध्ये तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार,प्रति पंढरपूर आळंदी विठ्ठल मूर्ती, श्री छत्रपती संभाजी महाराज स्मारक व छत्रपती शिवाजी महाराज उद्यान त्याचप्रमाणे श्रीराम मूर्ती उभारण्यात आली आहे यामध्ये नानासाहेब पेशवे यांचे देखील स्मारक कर्जत शहरांमध्ये उभारले जाईल असा शब्द याप्रसंगी दिला.

या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार श्री सुरेश लाड यांच्यासह भाजप जिल्हा अध्यक्ष श्री.अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस भाजपा श्री. दीपक बेहेरे ,नानासाहेब पेशवे यांच्या द्विशताब्दी जयंती सोहळ्याचे उपाध्यक्ष श्री.भाई गायकर, समितीचे सचिव श्री.रमेश मुंढे, खजिनदार श्री.नितीन कांदळगावकर तसेच श्री. सुधीर थोरात, भाजप तालुका अध्यक्ष श्री.राजेश भगत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला श्री शिवाजी रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. विवेक सुर्वे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात विविध शाळांनी समर गीते सादर केली, तर पुणे येथील रमणबाग मंडळाच्या तरुणींनी मैदानी खेळ सादर केले. या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील इतिहास प्रेमी , व कर्जत खालापूर मतदार संघातील असंख्य नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!