दिव्यातील डॉ. सतिश केळशीकर यांना आंतरराष्ट्रीय ह्यूमन राइट कडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड -२०२४ प्रदान.
संतोष पडवळ (प्रतिनिधी)
ता १४ डिसें २०२४
ठाणे : दिव्यातील डॉ. सतिश केळशीकर यांना आंतरराष्ट्रीय ह्यूमन राइट कडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड -२०२४ देण्यात आले. मुंबईतील अंधेरी येथील मेहर हॉल येथे सदर कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. प्रसंगी आमदार अरुण खान, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुरेखा कपिले, तसेच मिस इंडिया बॉलीवुड अभिनेत्री प्रियंका रॉय आदी उपस्थित होते.