दिव्यातील आर्या संदीप वायले महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेत द्वितीय.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १६ डिसें : दिव्यातील कु. आर्या संदीप वायले हिने महाराष्ट्र सौंदर्यवती (बाल गट) स्पर्धेत पुण्यातील आचार्य यात्रे सभागृह येथे पार पडलेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवला आहे. आर्या संदीप वायले ही आर्य गुरुकुल दातीवली या शाळेची विद्यार्थिनी असून एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायक कार्य केले आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला एकाच वेळी सौंदर्य, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व आणि समाजसेवा या सर्व बाबींचा उत्तम समतोल साधावा लागतो. आर्याने यशाच्या या शिखरावर पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि समर्पण यांचा आदर्श निर्माण केला आहे.
आर्याने आपल्या जीवनात सौंदर्यवती स्पर्धेच्या मार्गावर जाण्यापूर्वीच शालेय जीवनात विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. तिच्या व्यक्तिमत्वामध्ये एक अशी चमक होती जी इतरांना आकर्षित करत असे. आर्याला लहानपासूनच नृत्य करण्याची खूप आवड आहे आणि आपली ही कला तीने जोपासून आज हे यश संपादन केला आहे आर्याला केवळ नृत्याचीच प्रगती साधायची नव्हे, तर तिचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी आणि सशक्त कसे होईल यावर तिने लक्ष केंद्रित केले. त्यासाठी तिने विविध व्यक्तिमत्व विकासाच्या कार्यशाळांमध्ये भाग घेतला शालेय सर्व स्पर्धामध्ये सहभाग नोंदवला.तिच्या यशामागे तिच्या कुटुंबाचा व शालेय शिक्षकांचा नेहमीच पाठिंबा होता. तिचे कुटुंब नेहमीच तिला प्रोत्साहित करत राहिले. तिचे पालक तिच्या स्वप्नांच्या मागे कायम खंबीरपणे उभे होते. यामुळे तिला मानसिक बळ मिळालं आणि ती आपल्या ध्येयाकडे एकाग्रतेने झपाटलेली होती.
आर्या संदीप वायलेचा यश हे केवळ एक सौंदर्यवती म्हणून मिळवलेला द्वितीय क्रमांक नव्हे तर ती एक प्रेरणा आहे. तिच्या यशाने हे सिद्ध केले की, मेहनत, कष्ट, आणि समर्पण यांचा योग्य संगम व्यक्तिमत्वाचा आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील यशाचा एक मंत्र आहे. तिने आपला आत्मविश्वास आणि कामाची निष्ठा जपत या स्पर्धेतील सर्व जजेस आणि प्रेक्षकांना प्रभावित केले. तिच्या यशामुळे समाजातील प्रत्येक युवतीला तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा मिळेल व समाजात एक सकारात्मक बदल घडविण्याचा मनोबल आणेल.