दिव्यातील प्रभास कराटे अँकडमी तर्फे यशस्वी विद्यार्थ्यांना बेल्ट व पदके.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १५ डिसें : दिवा शहरातील प्रभास कराटे स्पोट्स अँकडमी कडून प्रशिक्षण घेतलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना बेल्ट पदक देऊन सन्मानित व गौरविण्यात आले. सदर सोहळा दिवा दातीवली येथील न्यू गुरकुल शाळेत रविवारी दि.15 डिसेंबर रोजी पार पडला. प्रसंगी बेल्ट परीक्षेत यशस्वी पास झालेले विद्यार्थ्यांना बेल्ट पदक देण्यात आली
प्रसंगी दिव्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल व बेल्ट वाटप करण्यात आले. प्रेसिडेंट फाउंडर प्रशांत प्रभास कराटे स्पोट्स अँकडमीचे प्रमुख तसेच प्रवीण उतेकर, दशरथ सोनवणे, कविता मगरे, सुनीता उतेकर, आनंदा कसबे, पार्वती कसबे, भारती कसबे, मनीषा लांडगे, अरुण जाधव तसेच जयसिंग कांबळे उपस्थित होते.