दिव्यात तन्मय प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट स्पर्धेत श्रेयांश ११ टीम प्रथम.

0

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता १७ डिसें : तन्मय प्रतिष्ठान दिवा आयोजित बेडेकर प्रीमियर लीग २०२४ पर्व सहावे या पर्वाचे खूप सुंदर नियोजन कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. बेडेकर प्रीमियर लीग प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या मनात घर करून बसली आहे. बेडेकर प्रीमियर लीग न थांबता सहावे पर्व कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता यशस्वी रित्या संपन्न झाले त्याबद्दल टिनू बेडेकर आणि तन्मय प्रतिष्ठान चे अध्यक्ष शुभम बेडेकर तसेच आयोजक यांनी मेहनत घेतली.


पर्व सहाचे मध्ये एकूण ८ संघ सहभागी झाले होते सर्वांनी उत्तम खेळाचे सादरीकरण केले. यातून प्रथम विजेता संघ श्रेयांश इलेव्हन आणि उपविजेता संघ ठरला दत्तात्रेय प्रतिष्ठान या दोन्ही संघाचे भव्य चषक देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी सर्व संघाचे प्रशस्ती देऊन सन्मान करण्यात आला.

प्रसंगी स्पर्धेला दिवा पोलीस चौकीचे सपोनि अनिल सोनवणे, शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी तसेच चरणदास म्हात्रे, जयेश पाटील (सोनारपाडा ५०५०) बालाजी कदम, तुकाराम मुंडे, ज्ञानेश्वर बेडेकर, विश्वनाथ बेडेकर, राम पवार, वैभव बेडेकर, तन्मय प्रतिष्ठान कमिटी एकविरा माऊली तन्मय प्रतिष्ठान गोविंदा पथक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी विशेष आकर्षण बैलगाडा शर्यत बादशहा सोन्या बैल ५०५० याचं दर्शन पार पडले. तर टिनू दादा बेडेकर, शुभम दादा बेडेकर यांचे आणि त्यांचा सहकाऱ्यांचे प्रथमेश कदम, दिल्पेश कदम, अमित मुरकर, अमित देवळे, अविनाश भुवड, योगेश राणे कमिटीचे आभार मानण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!