दिवा पश्चिमेतील धोकादायक मालमत्ता कर कार्यालयाचे होणार स्थलांतर.
दिवा पश्चिमेतील धोकादायक मालमत्ता कर कार्यालयाचे होणार स्थलांतर.
ऍड. रविराज बोटले यांच्या मागणीला यश.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १८ डिसें : दिवा पश्चिमेतील ठाणे महानगर पालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या मालमत्ता कर विभागातील इमारती मधील रूमची दुरावस्था उघडकीस आली होती. दिवा शहरातील मालमत्ता कर विभाग कोटींच्या घरात कर जमा केला जातो त्याच इमारतीत अधिकारी, कर्मचारी तसेच मालमत्ता कर ग्राहक ये-जा करत असतात सदर कार्यालयातील दुरावस्थेमुळे कर्मचाऱ्यांना आपला जीव मुठीत ठेऊन काम करावे लागत आहे. मालमत्ता कर विभागाची अनेक महत्वाची कागदपत्रे व फाईल असणाऱ्या रूम मधील पोटमाळा धोकादायक स्थितीत असून त्याला कश्या प्रकारे आधार देण्यात आला असल्याचे निदर्शनास आल्याने एड. रविराज बोटले यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रकरणी दिवा प्रभाग समितीच्या मालमत्ता कर विभागातील इमारती मधील रूमची दुरावस्था तात्काळ दूर करण्यासाठी व मालमत्ता कर विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी दिवा प्रभाग समितीच्या मुख्य कार्यालयातील सहायक आयुक्तांना एखादी दुर्दैवी दुर्घटना घडू नये म्हणून कार्यालयात संरचनात्मक सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याची मागणी केली होती. प्रकरणी सहायक आयुक्त भालचंद्र घुगे यांनी तात्काळ पाठपुरावा करुन सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून लवकरच उपाययोजना करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.