दिव्यात डॉ. सतिश केळशीकर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर संपन्न.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १९ डिसें : दिव्यात भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे सिरचिटणीस डॉ. सतीश केळशीकर यांचा वाढदिवसा निमित्त संपूर्ण आठवडा सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसंगी दिव्यातील अपना घर या वृद्धआश्रमातील सर्व वृद्धाना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. तर ऐक दिवस केळशीकर यांच्या कार्यालयात आधार कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले. आज प्लाझमा ब्लड बँक यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर पार पडले. प्रसंगी अनेकांनी रक्तदान केले. तर ठाणे महापालिका शाळेना विद्यार्थ्यांना वह्या वाटप, दिव्यांग व्यक्तींना रेशनींग किट वाटप तसेच मोफत आरोग्य शिबीर ठेवण्यात आले संपूर्ण सप्ताह सामाजिक उपक्रम रविवार पर्यंत सुरु राहणार आहेत असे केळशीकर यांनी स्पष्ट केले आहे.
प्रसंगी सतिश केळशीकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. मोठ्या संख्येने नागरिकांनी व मान्यवरानी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्याशुभेच्छा दिल्या. प्रसगी रवींद्र धुरी, मंडळ अध्यक्ष सचिन भोईर तसेच रामराज मिश्रा, नितीन कोरगावकर, समशेर यादव, विनय भोईर, दत्ता पाटील, दत्ता कोलते व रवी मुनावर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मित्र मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.