दिव्यातील डॉन बॉस्को हायस्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २१ डिसेंबर : दिव्यातील डॉन बोस्को हायस्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन दिवा पुर्व येथील नागनाथ मंदिर येथील भव्य मैदानात पार पडले. प्रसंगी दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र तोरडमल यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रसंगी छोटा शिशू ते इयत्ता १० वी पर्यंतच्या अनेक स्पर्धेत विशेष प्रविण्य मिळवलेले यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशिस्ती पत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. डॉन बोस्को या इंग्रजी माध्यम असलेल्या हायस्कुलमध्ये सी बी एस सी व महाराष्ट्र बोर्ड या दोन्ही माध्यमातून विध्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. दरवर्षी शाळेत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा, तसेच विविध प्रकारचे खेळ तसेच इतर सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असून शाळेने अनेक यशस्वी विद्यार्थी घडवण्याचे धैर्य दाखवून उच्च शिक्षण देत आहे.
वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी अनेक शालेय मुलामुलींनी आपला कला अविष्कार दाखवत नृत्य साजरे केले. प्रसंगी मुख्याध्यापक रामबाबू राय,चांदणी यादव, अमित यादव, रागिणी राय यांच्यासह अखिलेश सिंग, शिरंजनदेवी राय, साक्षी सिंग तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व अनेक मान्यवर व शेकडो विद्यार्थी व पालक उपस्थित होते.