दिव्यातील अखिल ट्युटोरियलचा २६ वा युथ आयकॉनिक फेस्ट उत्साहात संपन्न.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २३ डिसेंबर : दिव्यातील अखिल ट्युटोरियलचा २६ वा युथ आयकॉनिक फेस्ट उत्साहात संपन्न झाले. दिवा पुर्व येथील नागनाथ मंदिर येथील भव्य मैदानात हा फेस्ट पार पडला. प्रसंगी अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता ५ वी ते १० वी (इंग्रजी माध्यम) सायन्स, कोमर्स, आयसीएसई / JEE/NEET/ Entrance/ MHTCET चे शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी येथे शिक्षण घेत आहे.
प्रसंगी अखिल ट्युटोरियलच्या अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीनी अनेक स्पर्धेत विशेष प्रविण्य मिळवलेले यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशिस्ती पत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सदर २६ व्या युथ आयकॉनिक फेस्ट प्रसंगी अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले, वेशभूषा स्पर्धा पार पडली, अनेक यशस्वी विद्यार्थी घडवण्याचे काम अखिल ट्युटोरियल करत असून उच्च शिक्षण देत आहे. प्रसंगी अनेक मुलामुलींनी आपला कला अविष्कार दाखवत गायन, नृत्य साजरे केले. प्रसंगी संचालक अखिलेश सिंग यांच्यासह नितेश पाठक, रागिनी यादव, माणिक शुक्ला, संदेश पाटील, गजानन पाटील, रामबाबू राय, शिरंजनदेवी राय, साक्षी सिंग, अमित यादव, रागिणी राय तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व अनेक मान्यवर व शेकडो विद्यार्थी व पालक उपस्थित होते.