माथेरान शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ; आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांना यश
![](https://shivnerinews.in/wp-content/uploads/2024/12/IMG-20241224-WA0079.jpg)
माथेरान शहरातील पाणीपुरवठा सुरळीत: आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांना यश
माथेरानच्या विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे: पाणीटंचाईवर उपाय!
नेरळ (माथेरान): सुमित क्षिरसागर
महाराष्ट्रातील थंड हवेचे प्रसिध्द पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान शहरातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येतून दिलासा मिळाला आहे. उल्हास नदीवरून बंद असलेला पाणीपुरवठा कर्जत-खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री.महेंद्र थोरवे यांच्या अथक प्रयत्नांमुळे पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून माथेरानमधील नागरिक पाणीटंचाईमुळे त्रस्त होते. नदीवरील पाणीपुरवठा योजना बंद झाल्याने शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, आमदार श्री महेंद्र थोरवे यांनी प्रशासकीय पातळीवर या विषयाला प्राधान्य दिले. विविध शासकीय विभागांशी चर्चा करून आणि तांत्रिक अडचणी दूर करत, त्यांनी या योजनेला पुन्हा कार्यान्वित केले.
या योजनेच्या पुन्हा सुरूवातीमुळे माथेरानच्या हजारो नागरिकांसह पर्यटन व्यवसायिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या पुढाकारामुळे शहरातील जीवनमान सुधारेल आणि पर्यटनाला चालना मिळेल.
नागरिकांनी आमदार श्री महेंद्र थोरवे यांचे विशेष आभार मानले असून, त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल आमदार थोरवे यांचावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.