दिव्यात मा. नगरसेवक शैलेश पाटील यांच्याहस्ते दिनदर्शिका २०२५ प्रकाशन.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २५ डिसें : श्रीकांत शिंदे मित्र मंडळ आयोजित दिवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांच्या वतीने आज येणाऱ्या 2025 ची नवीन दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. दिवा वासियांसाठी जवळपास ३० हजारंपेक्षा जास्त दिनदर्शिका मा. नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वतीने नागरिकांना वाटण्यात येणार आहेत.
सदर दिनदर्शिका २०२५ प्रकाशन प्रसंगी कैलास भगत, चेतन भगत, कुणाल पाटील, श्रीगणेश पाटील, समीर पाटील, हितेश पाटील, मयूर भगत, भूषण म्हात्रे, सोपान भगत, राम गुप्ता, प्रदीप पाटील, विनायक निंबाळकर आदी दिवा विकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. दिवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिव्यात गेली अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविला जातं आहे दिनदर्शिका वाटप करण्यासाठी आलेले कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे आभार मानत पाटील यांनी उपक्रमाची सांगता केली.