दिव्यात युवासेना आयोजित सार्व. गणपती सजावट स्पर्धेत साईनाथ मित्र मंडळ प्रथम.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २५ डिसें : युवासेना दिवा शहर यांच्या माध्यामातून अभिषेक ठाकूर शहर अधिकारी युवासेना दिवा शहर आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुमित हॉल येथे मा. आमदार सुभाष भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर स्पर्धेमध्ये शहरातील ३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी सहभाग नोंदवला होता. गणेशोत्सवाच्या देखाव्यातून सामाजिक संदेश, उत्कृष्ट सजावट, सण उत्सवाची परंपरा जपणे अशा विविध विषयांवर परीक्षण करून प्रथम, द्वितीय, तृतीय यांस सन्मानचिन्ह व रोख रक्कम स्वरुपात बक्षीसे देवून प्रोत्साहित करण्यात आले.
सदर स्पर्धेमध्ये साईनाथ मित्र मंडळ हे प्रथम क्रमांक पटकावत विजयी झाले असून त्यांना सन्मान चिन्ह , रोख रक्कम व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. द्वितीय क्रमांक बी. आर. म्हात्रे प्रतिष्ठान तसेच तृतीय क्रमांक वक्रतुंड मित्र मंडळ विजेते ठरले असून जाहीर करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. प्रसंगी युवासेना विधानसभा अधिकारी सूरज जाधव, महिला विधानसभा संघटिका योगिता नाईक, उपशहर संघटक प्रविण उतेकर, ॲड. दिनकर देसाई, राहुल चौधरी, युवासेना सचिव उमेश राठोड, युवासेना उपशहर अधिकारी सुयोग राणे, विभागप्रमुख राजेश भोईर, हेमंत नाईक, संजय जाधव, विभाग अधिकारी अक्षय भोईर, आकाश शुक्ला, उपविभागप्रमुख संजय भोईर, महेश खेतले, अजित माने, अशोक अमोंडकर, संजय अर्दाळकर, शाखाप्रमुख प्रतिक म्हात्रे, ओकेश भगत, अनिकेत सावंत, शशिकांत कुंभारगण, शरद मिंदे, शाखा सांघटिका सुजाता मोरे, पूजा अग्रहारी, उपशाखाप्रमुख धनाजी पोवार, शंकर राणे उपस्थित होते.