अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या भरधाव कारच्या धडकेत एक ठार तर ऐक गंभीर.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
मुंबई ता २८ डिसेंबर :
शुटींग संपवून घरी परतत असताना उर्मिलाच्या कारचा हा अपघात झाल्याच समजतं. या अपघातात उर्मिला गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे गाडीची एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचला. असं असलं तरीही तिच्या कारचा मात्र चक्काचुर झाला आहे. हा अपघात कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ झाला असून, मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना भरधाव कारने धडक दिली, या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला.
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिलाच्या कारचा वेग जास्त होता. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली. तसेच, या प्रकरणी समतानगर पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, अभिनेत्री उर्मिला कोठारे ही प्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांची सून असून महेश कोठारे यांचे पूत्र आदिनाथ कोठारे यांची पत्नी आहे. उर्मिला कोठारे ही नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेतून तब्बल 12 वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते.