धक्कादायक, मुलाच्या लग्नात बापाचा दुर्दैवी मृत्यू
ठाणे, ता 22, मे (प्रतिनिधी) ठाण्यात मुलाच्या लग्न कार्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. पंडित शंकर मोरे (वय ५५) यांचे शुक्रवारी निधन झाले. पंडित शंकर मोरे यांचा मुलगा गणेश याचे शुक्रवारी (दि.२०) रोजी ठाणे (कोल्हापूर,तालुका पन्हाळा) लग्न कार्य होते. मुलाच्या शुभकार्यात आदल्या दिवशीच्या हळदीच्या कार्यक्रमापासून ते अक्षतेपर्यंत वरूणराजाने अडथळा निर्माण केल्याचे शल्य त्यांच्या मनात होते. मनात असणाऱ्या शल्य त्यांनी नातेवाईकांच्याकडे वारंवार बोलून दाखवले होते. इतर कार्यक्रम उरकून रात्री मंडपाच्या स्टेजवर नृत्यांचा आनंदोत्स सुरू होता.
नातेवाईकांच्या “वन्समोर” च्या विनंतीनुसार तिघे भाऊ एकत्रित नाचत असताना ते अचानक स्टेजवर कोसळले आणि ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे.