दिवा खर्डी येथे देवनागरी सामाजिक संस्थातर्फे भव्य मोफत नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ५ जाने : ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा शहराजवळील खर्डी गाव येथील निर्मलनगरी येथील देवनागरी सामाजिक संस्था व हजी बचू अली डोळ्यांच्या हॉस्पिटल परेल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच संस्थेचे कार्यसम्राट अध्यक्ष नाना मोकाशी यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डीगाव येथील सात्विक योगा सेंटर येथे हजी बचू अली डोळ्यांच्या हॉस्पिटल परेल मुंबई यांच्या सहकार्याने मोफत नेत्र चिकित्सा, अल्प दरात चष्मावाटप आणि मोफत नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात निर्मलनगरीतील ११ रहिवासी इमारतीसह आजूबाजूच्या परिसरातील शेकडो नागरिकांनी शिबिरास आपली उपस्थिती दर्शविली. प्रसंगी एकूण 44 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
देवनागरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नाना मोकाशी यांच्या पुढाकाराने पाणीप्रश्न मार्गी लागला असून संस्थेच्या वतीने दहीहंडी उत्सव, नवरात्र उत्सव, शिवजयंती सोहळा, व्होटिंग कार्ड, आधार कार्ड,आरोग्य शिबिर अनेक सामाजिक, राजकीय, संस्कृतीक उपक्रम राबविले जातात. सदर शिबिर प्रसंगी रोहिदास म्हात्रे (उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीण), रमेश काथे ( शिवसेना विभागप्रमुख शिळ), अमित साळुंखे (शिक्षकेतर सेना मुंबई विद्यापीठ संघटक प्रमुख) यांच्यासह अनेक मान्यवर संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.