सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी, लेखक व पत्रकार प्रीतिश नंदी यांच निधन.
मुंबई ता ९ : सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी, लेखक आणि पत्रकार प्रीतिश नंदी यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून
दिले.
सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते, कवी, लेखक, पत्रकार तसेच राज्यसभेचे माजी खासदार प्रीतिश नंदी यांचे बुधवारी रात्री निधन झाले. अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पत्रकार प्रीतिश नंदी यांनी 1990 च्या दशकात दूरदर्शनवर ‘द प्रीतिश नंदी शो’ नामक एका टॉक शोचे संचालन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रसिद्ध व्यक्तींची मुलाखत घेतली. 2000 च्या सुरुवातीला त्यांनी प्रीतिश नंदी कम्युनिकेशन्स या आपल्या बॅनरखाली सूर, कॉंटे, झंकार बीट्स, चमेली, हजारो ख्वाहिशे ऐसी, प्यार के साइड इफेक्ट्स, अशा चित्रपटांची निर्मिती केली आहे.