ठाण्यात अल्पवयीन पिकअप चालकाचा ताबा सुटल्याने दोन रिक्षाना धडक ; ऐक ठार तर ऐक गंभीर

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे : आज दिनांक १३/०१/२०२५ रोजी ०७:३४ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार सुमारे ०२:३५ वाजता कांचनगंगा कॉम्प्लेक्स गेट क्र. १ समोर, सुरज वॉटर पार्क जवळ, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे (प.) या ठिकाणी घोडबंदर रोड वरून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनी वरती Mahindra & Mahindra LIM. BOL MAXX PUP, MH 04 LY 1204 (मालक:- अज्ञात, चालक:- श्री. साई कृष्णा मनोज बिस्वाल, वय-१५ वर्षे, मार्ग:- घोडबंदर रोड कडून मुंबईकडे जात असताना या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या १) ऑटो रिक्षा क्रमांक – MH 04 KA 6736 (मालक:- अज्ञात, रिक्षामध्ये असलेली व्यक्ती श्री. जितेंद्र मोहन कांबळे, वय- ३१, रस्त्याच्या कडेला उभी रिक्षा. २) ऑटो रिक्षा क्रमांक- MH 03 DC 6732 (मालक:- अज्ञात, रिक्षामध्ये असलेली व्यक्ती- श्री. गणेश विश्वनाथ वाघमारे, वय- २९, रस्त्याच्या कडेला उभी रिक्षा.) या दोन ऑटो रिक्षांना मागून धडक देऊन महिंद्रा पिकप रस्त्याच्या बाजूला मेट्रो काम करण्याकरता खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून अपघात झाला होता. सदर घटनास्थळी कासारवडवली पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सदर घटनेत ऑटो रिक्षामधील एक व्यक्ती मयत असून एक व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातात दोन ऑटो रिक्षामध्ये असलेल्या व्यक्तींची माहिती पुढील प्रमाणे :-
१) ऑटो रिक्षा क्रमांक – MH 04 KA 6736 (मालक:- अज्ञात, रिक्षामध्ये असलेली व्यक्ती- श्री. जितेंद्र मोहन कांबळे, वय- ३१, राहणार – नेहरूनगर, वर्तकनगर, ठाणे (प.) सदर व्यक्तीला अपघातामध्ये गंभीर दुखापत झाल्याने उपचाराकरिता तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेमधून जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे दाखल केले असता तेथील डॉक्टर यांनी सदर व्यक्तीला मयत घोषित केले.
२) ऑटो रिक्षा क्रमांक- MH 03 DC 6732 (मालक:- अज्ञात, रिक्षामध्ये असलेली व्यक्ती- श्री. गणेश विश्वनाथ वाघमारे, वय- २९,) सदर व्यक्तीला अपघातामध्ये गंभीर दुखापत झाल्याने उपचाराकरिता तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेमधून जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे दाखल केले असून सदर व्यक्तीवरती उपचार सुरू आहेत.
सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरक्षितेच्या कारणास्तव धोकापट्टी बांधण्यात आली आहे.
अपघातग्रस्त महिंद्रा पिकप वाहनाचे वाहनचालक श्री. साईकृष्णा मनोज बिस्वाल, वय-१५ वर्षे, राहणार – पुरुषोत्तम नयन बिल्डिंग, कासारवडवली, ठाणे. यांना कासारवडवली पोलीस कर्मचारी यांच्याकडून ताब्यात घेण्यात आले असून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
सदर घटनास्थळी रस्त्याच्या बाजूला असलेली अपघातग्रस्त वाहने वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्याकडून टोइंग वाहनाच्या साहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
सद्यस्थितीत घोडबंदर रोड-मुंबई वाहिनीवरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.वरील सर्व माहिती कासारवडवली पोलीस स्टेशन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्यावत.