अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोराचा चाकू हल्ला

संतोष पडवळ – प्रतिनिधी
मुंबई ता १६ जाने : अभिनेता सैफ अली खानच्या घरात बुधवारी रात्री २:३० वाजता सुमारास चोर शिरला होता. घरात चोर शिरल्याचं समजल्यानंतर सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. आरडाओरड ऐकून बाहेर नेमका काय गोंधळ सुरु आहे हे पाहण्यासाठी झोपेतून जागा झालेला सैफ अली खान बेडरुममधून बाहेर आला असता सैफ अली खान त्याच्या बेडरुममधून बाहेर आला तसा समोर हा चोर उभा असल्याचं दिसलं. एकीकडे चोर घरात शिरल्याने कर्मचाऱ्यांचा गोंधळ सुरु असतानाच सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी सैफला काही समजण्याच्या आधीच चोराने सैफ आपल्याला पकडेल या भीतीने त्याच्याकडील चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली. सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरचाकर तातडीने त्याच्या मदतीला धावले. त्यांनी सैफला लिलावती रुग्णालयात दाखल केलं. सर्वजण जखमी झालेल्या सैफच्या मदतीला धावल्याने या संधीचा फायदा घेत चोराने पळ काढला. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला आहे.