दिव्यात आमदार नितेश राणे व निरंजन डावखरे यांच्याहस्ते भाजपच्या तीन नवीन कार्यालयाचं उदघाट्न

0

दिव्यात आमदार नितेश राणे व निरंजन डावखरे यांच्याहस्ते भाजपच्या तीन नवीन कार्यालयाचं उदघाट्न.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर डागली तोफ

ठाणे, दिवा. ता 23 मे (प्रतिनिधी) :-दिव्यातील जनतेने शिवसेनेला भरभरून मते दिली मात्र शिवसेनेने दिव्यातील कोकणी माणसांचा केवळ मतांसाठी वापर केला असून कायम अन्याय केला आहे.येथील जनतेला साधं पाणी आणि सोयी सुविधा हे उपलब्ध करून देऊ शकत नाहीत असा घणाघात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिवा येथे आयोजित कार्यक्रमात केला.
दिव्यातील तीन भाजप कार्यालयांचे उदघाटन रविवारी संध्याकाळी नितेश राणे आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना नितेश राणे यांनी दिव्यातील शिवसेनेच्या मनमानी कारभाराचा समाचार घेताना येथील कोकणी माणसांना भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य केले.सेनेच्या चुकीच्या धोरणावर आवाज उठवणाऱ्या सेनेवाले कोण धमकी देत असतील तर त्यांचे फोटो मला द्या,भाजपच्या कार्यकर्त्यांना कुणी धमकी देऊ नये असा इशारा नितेश राणे यांनी दिला.दिव्यात शिवसेनेची सत्ता असूनही येथील नागरिकांना पालिकेच्या सोयीसुविधा मिळत नाहीत,ठाण्याचा महापौर दिव्या मुळे बसला असताना दिव्यातील जनतेला पाणी मिळत नाही.हॉस्पिटल चा प्रश्न तसाच आहे.येथील जनतेला चांगले जीवन मिळत नाही, सामान्य जनतेवर अन्याय सुरू आहे.पालकमंत्री, खासदार यांचे दिव्याकडे लक्ष नाही.शिवसेना दिव्यातील जनतेला फक्त गृहीत धरते असा घणाघात नितेश राणे यांनी केला.

भाजपला एक संधी द्या,कोकणवासीयांना सिंधुदुर्ग प्रमाणे विकास करून दाखवतो..
दिव्यातील जनतेने भाजपला एक संधी दिव्यात द्यावी.ज्या पद्धतीने कोकणातील जनता गावी विकास अनुभवते त्याच धर्तीवर दिव्यात विकास करून दाखवतो,येथील पाण्याचा प्रश्न तातडीने निकालात काढून दाखवतो त्यासाठी एक संधी दिव्यातील कोकणी माणसांनी भाजपला द्यावी असे आवाहन राणे यांनी केले.

आगासन स्थानकाला थांबा मिळवून देणार

कोरोना काळात आगासन रेल्वे स्थानकाचा थांबा बंद करण्यात आला आहे हा थांबा केंद्रात प्रयत्न करून मिळवून देणार जेणेकरून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होईल असे नितेश राणे म्हणाले.

यावेळी रोहिदास मुंडे व ज्योती पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयासह साबे येथील अशोक पाटील ओमकार नगर येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.या कार्यक्रमाला भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे प्रदेश सचिव संदीप लेले संघटक सरचिटणीस विलास साठे सरचिटणीस मनोहर सुखदरे उपाध्यक्ष विजय त्रीपाठी नरेश पवार युवा मोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर ओबीसी उपाध्यक्ष विनोद भगत कार्यकारणी सदस्य विजय भोईर गणेश भगत मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे संघटक सरचिटणीस दिलीप भोईर सरचिटणीस समीर चव्हाण युवराज यादव युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंग गुजराती सेल अध्यक्ष रमेश वोरा व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर मधुकर पाटील प्रवीण पाटील अंकुश मढवी नागेश पवार प्रशांत आबोणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते
ठाणे शहर अध्यक्ष व कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे कोकण चे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत दिव्यातील बेतवडे गावचे दिलीप पाटील मयुरेश्वर नगर येथील बैधनाथ पाडी व सहकारी यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!