दिव्यातील समृद्धी कोटगीला नाट्य स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनयास गोल्ड मेडल.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १९ जाने : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत दिव्यातील समृद्धी कोटगी हिला नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयास गोल्ड मेडल जाहीर करण्यात आले आहे. मुंबई केंद्रातून मोरया प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच बृहन्मुंबई पोलीस कल्याण निधी, मुंबई या संस्थेच्या इन्शाअल्ला या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली असून या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई केंद्रावर प्रवेश कला क्रीडा मंच या संस्थेच्या तुझ्या रुपात मी…या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक महेंद्र दिवेकर (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), द्वितीय पारितोषिक सुशील इनामदार (नाटक- इन्शाअल्ला), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक प्रसन्न निकम (नाटक- इन्शाअल्ला), द्वितीय पारितोषिक – श्याम चव्हाण (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), नेपथ्य : प्रथम पारितोषिक रजनिश कोंडविलकर (नाटक-इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), द्वितीय पारितोषिक रजनिश कोंडविलकर (नाटक- कायाप्पाचा पाडा), रंगभूषा : प्रथम पारितोषिक राजेश चव्हाण (नाटक- मी तर बुआ अर्धा शहाणा), द्वितीय पारितोषिक अनिल कासकर (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सुशील इनामदार (नाटक -इन्शाअल्ला) व समृध्दी कोटगी (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अक्षता सुर्वे (नाटक- इन्शाअल्ला), शांती बावकर (नाटक- तुझ्या रुपात मी…), अपूर्वा बावकर (नाटक- घर त्या तिघांचं), अमिषा घाग (नाटक- तुझ्या रुपात मी…), अंकिता आग्रे (नाटक- संघर्ष जगण्याचा – लक्षवेध एकलव्याच्या ध्येयपूर्तीचा), सुशील पवार (नाटक- तुझ्या रुपात मी…), हेमंत घाटगे (नाटक- इम्युनिटी द व्हाईस ऑफ टॉलरन्स), आत्माराम धर्णे (नाटक- धुमशान), प्रणय भुवड (नाटक-मोक्ष), श्वेत बगाडे (नाटक-द हंग्री क्रो).
सदर नाट्य स्पर्धा २३ डिसेंबर, २०२४ ते १४ जानेवारी, २०२५ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १९ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रमाकांत भालेराव, विवेक खरे आणि प्रतिभा तेटु यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मुंबई केंद्राचे समन्वयक म्हणून प्रियांका फणसोपकर यांनी काम पाहिले.