दिव्यातील महालक्ष्मी महिला फाऊंडेशनचा खेळ पैठणी व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २० जाने : महालक्ष्मी महिला फाऊंडेशन तर्फे आज दिवा शहरातील टाटा लाईन गणेशपाडा, दातिवली येथे महिलांच्या सन्मानासाठी हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता फाऊंडेशनच्या संस्थापिका सोनम संतोष देसाई तसेच अध्यक्षा विनिता विनोद लाड व मार्गदर्शक संतोष देसाई यांनी सर्व महिलांच्या आवडीचा होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) कार्यक्रम ठेवण्यात आला होता. प्रसंगी महिलांचा उत्स्फूर्त सहभागात प्रतिसाद दिसून आला. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजित कदम यांनी केले प्रसंगी दहावी बारावी उत्तीर्ण यशस्वी विद्यार्थांचा गुणगौरव व सत्कार सोहळा करण्यात आला व मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता.
सदर कार्यक्रम प्रसंगी मा. उपमहापौर तथा दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी, मा.नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे, दातिवली विभागप्रमुख चरणदास म्हात्रे व देवयानी मुंडे अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.