दिवा भाजपच्या वतीने ३० जानेवारी पर्यंत सरकारी योजना व दाखले शिबीर सुरु.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २७ जाने : दिवा रेल्वे स्थानक पुर्व येथे भारतीय जनता पार्टी आयोजित आजपासून ३० जानेवारी २०२५ पर्यंत सलग चार दिवसीय सरकारी योजना व दाखले शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आधार कार्ड शिबिर, आदित्य बिर्ला आरोग्य विमा, नवीन मतदार नोंदणी, जेष्ठ नागरीक ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र आदी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यातील नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेण्याचे दिवा भाजप मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मा. महिला मोर्चा अध्यक्षा सीमा गणेश भगत यांनी महिलांना संबोधीत करून महिलांनी समृद्धी सुकन्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सदर शिबिरात सहभागी होऊन मिळणाऱ्या सरकारी योजना व सुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता येणार आहे.
सदर लोकांभिमूख शिबिर मोठ्या उत्साहात सुरु झाले असून प्रसंगी दिवा भाजपचे अशोक पाटील, विनोद भगत, रोशन भगत, विजय भोईर, प्रवीण पाटील, समीर चव्हाण, गणेश भगत, नितीन कोरगावकर तसेच महिला मोर्च्याच्या सपना भगत, सीमा भगत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.