दिव्यातील साबेगाव येथील राधाकृष्णा चाळ सोसायटी जवळ नैसर्गिक नाला बुजून अनधिकृत चाळ बांधकाम अनधिकृत बांधकामासाठी वीस फूटी नाला पाच फूट केल्याने येत्या पावसाळ्यात चाळी जलमय होण्याची रहीवास्यांना भिती.

संतोष पडवळ (प्रतिनिधी)
ता ३ फेब्रुवारी २०२५
ठाणे : दिव्यातील साबेगाव येथील राधाकृष्णा चाळ सोसायटी जवळ नैसर्गिक नाला बुजून अनधिकृत चाळ बांधकाम सुरु असून ठाणे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. सदर ठिकाणी अनधिकृत चाळीच्या बांधकामासाठी वीस फूटी नाला पाच फूट केल्याने येत्या पावसाळ्यात चाळी जलमय होण्याची रहीवास्यांना भिती वाटू लागली असून प्रकरणी दिवा मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्याकडे अनेक तक्रारी आल्याने प्रकरणी लवकरच प्रशासनास दिवा मनसे धारेवर धरणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.