नेरळ: सुमित क्षिरसागर

ॐ नमस्ते गणपतये… त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि… असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, शाळकरी मुलांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरया च्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात विद्या विकास मंदिर शाळेकडून सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण केले. नेरळच्या राजाच्या गणपतीसमोर झालेल्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय झाले होते.

नेरळच्या राजाच्या मंडळाकडून अथर्वशीर्ष पठण केलेल्या शाळकरी मुलांना शालेयउपयोगी छोटी भेटवस्तू देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आल.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नेरळच्या राजाच्या उत्सव मंडपा समोर विद्या विकास मंदिर शाळेकडून सकाळच्या वेळेत अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत शाळकरी मुलांनी सकाळच्या समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार मूलचंद शेठ शहा, आशुतोष गडकरी, विशाल साळुंखे, राहुल कालेकर, कुणाल मनवे, प्रथमेश देशमुख, सुनील कालेकर आणि विद्या विकास मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा निकम,
स्नेहा म्हसे- इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका,रेखा काळे- शिक्षिका,सोनल बदले- शिक्षिका यावेळी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!