हर्षाली भगत आणि वल्लरी बेंद्रे यांचे जिल्ह्यात होतंय कौतुक. भाजपा जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर यांनी घेतली भेट

0

नेरळ: सुमित क्षिरसागर

हर्षाली भगत आणि वल्लरी बेंद्रे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात चमकगिरी कामगीरी करीत आपल्या कुटुंबाचे नाव उंचावले असून याची रायगड जिल्ह्यात कौतुक होत आहे.दरम्यान हर्षाली भगत आणि वल्लरी बेंद्रे यांची नुकताच भाजपा जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर यांनी भेट घेतली.कर्जत तालुक्यातील नेरळ शहरातील हर्षाली संतोष भगत हिची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल व वल्लरी बेंद्रे हिने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आपली दमदार कामगिरी केली आहे.
“मुलगी शिकली प्रगती झाली”या संकल्पनेतून हर्षाली भगत परिवारासाठी आनंदाची पर्वणी ठरली आहे. हर्षाली भगतचा खडतर प्रवासात तिचा पाठीमागे असणाऱ्या व तिला पाठबल देणाऱ्या सर्व व्यक्तींचे जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर यांनी आभार मानून हर्षाली भगत हिचा घरी भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मित्रपरिवार व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

एलएईएस शाळा विज्ञान प्रदर्शनामध्ये राज्यात चौथी….

राज्य विज्ञान प्रदर्शनामध्ये नेरळ मधील एलएईएस शाळेच्या प्रकल्पाला चौथा क्रमांक मिळाला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी वल्लरी बेंद्रे व क्रिशा सावंत यांनी मांडलेल्या किराणा साहित्य व गॅस सिलेंडर यांच्याबाबत अलर्ट करणारा प्रकल्प विज्ञान प्रदर्शन २०२५साठी पात्र ठरला आहे.

वल्लरी बेंद्रे हिने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल भाजपा जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर यांनी वल्लरी बेंद्रे या विद्यार्थिनीच तिच्या घरी जाऊन अभिनंदन करण्यात आल.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

   

You may have missed

error: Content is protected !!