⭕️मालवण जवळील तारकर्ली समुद्रात 20 पर्यटकांना घेऊन जाणारी बोट बुडाली
सिंधुदुर्ग, ता 24 मे (प्रतिनिधी) : मालवण जवळील तारकर्ली समुद्रात स्कुबा डायविंग करून परतीच्या मार्गावर किनारी येताना 20 पर्यटकांना घेऊन येणारी बोट समुद्रात बुडाली आहे. उधाण आलेल्या समुद्रात जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोट एका बाजूला कालांडली आणि त्यातील 20 प्रवासी पाण्यात पडले.
दोघेजणांचा बुडून मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर सहा जणांना मालवणच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 16 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या अपघातातील सर्व पर्यटक पुणे आणि मुंबईचे आहेत.
तारकर्ली हे स्कुबा डायविंग साठी सुप्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक जण मालवण कोकणमध्ये फिरायला येत असतात. समुद्री खेळासाठी इथे महाराष्ट्रभरातील हजारो लोकांची गर्दी होत असते. स्कुबा डायव्हिंगचे प्रमुख आकर्षण असलेल्या मालवणला गेल्या काही काळापासून तारकर्लीला पर्यटकांची पहिली पसंती मिळत आहे. सदर प्रकरणाची