दिवा दातीवली येथील आर्य गुरुकुल इंग्लिश शाळेचा “आर्योत्सव” संपन्न.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता ११ फेब्रु : आर्य गुरुकुल इंग्लिश स्कूल, दिवा दातिवली चा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आर्योत्सवाचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कला, संस्कृती आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील प्रगतीचे अद्भुत प्रदर्शन केले. ज्याला उपस्थित पालकांनी भर भरून दाद दिली. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुदर्शनाताई त्रिगुनाईत, सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन भगत, समाजसेवक सोपान म्हात्रे, गजानन म्हात्रे, विष्णू म्हात्रे, यश म्हात्रे, विष्णू पाटील, रेश्मा पवार, अर्चना पाटील, विकास इंगळे, गुरुनाथ दळवी, उमेश राठोड, आदी पाहूणे उपस्थित होते, पाहुण्यांनी शाळेच्या शिक्षणाच्या कार्याची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रशंसा केली. शाळेचे संचालक ऍड तुषार चंदर म्हात्रे, व मुख्यध्यापक सौ. प्रियंका ठीकेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची शिक्षिका प्रज्ञा पुरकर यांनी केले. प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नृत्य, संगीत, नाटक यांसारख्या विविध कला सादर करून विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा कठोर परिश्रम आणि समर्पण दिसून आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सहशिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार देण्यात आले. आऱ्योत्सव २०२५ हा शाळेच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून, भविष्यात अशा अनेक समारंभांचे आयोजन होईल, अशी शाळेच्या प्रशासनाकडून आशा व्यक्त करण्यात आली.