दिव्यात संत सेवालाल महाराज २८६ वी जयंती उत्साहात साजरी.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १५ फेब्रु : संत सेवालाल गोर बंजारा समिती दिवा शहर आयोजित २८६ वी जयंती दिवा शहरात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी संपूर्ण दिवा शहरात भव्य रॅली काढण्यात आली. दिवा चौकाजवळील मैदानात संत शिरोमणी सेवालाल महाराज व आई जगदंबा मरयम्मा माता यांची भोगविधी कार्यक्रम व महाप्रसाद तसेच शालेय विदयार्थी गुणगौरव सोहळा व नृत्यअविष्कार साजरा करण्यात आला. बंजारा समाजाचे अनेक प्रश्न व समस्याचे निराकरण करण्यासाठी सदैव पाठीशी राहू असे प्रतिपादन माजी आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केले.
प्रसंगी सदर कार्यक्रमास नगरसेवक दीपक जाधव, दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर, बालाजी कदम, संभाजी कदम, अनिलशेठ भगत, कुणाल पाटील, व्यापारी संघटनेचे चेतन पाटील, अरुण म्हात्रे, वासू चव्हाण, नामदेव राठोड, वसंत चव्हाण, बाबू राठोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर सदर समितीचे अध्यक्ष शंकर पवार, कार्याध्यक्ष उमेश राठोड, सचिव तारासिंग पवार. खजिनदार श्याम राठोड यांनी आलेल्या उपस्थित मान्यवरांनाचे स्वागत केले. तसेच संत सेवालाल गोर बंजारा समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.