दिव्यात सातारा जिल्हा रहिवासी संघाचा द्वितीय वर्धापनदिन उत्साहात संपन्न.

संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता १७ फेब्रु : अजिंक्यतारा सेवा संस्था प्रणित सातारा जिल्हा रहिवाशी संघ दिवा शहर आयोजित दुसरा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. दिवा शहरातील गणेश पाडा येथील गणेश विद्यामंदिर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रसंगी सातारा जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक, आजी माजी सैनिक, महिला आणि असंख्य बालगोपालांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. प्रसंगी महिलांचे हळदी कुंकू समारंभ पार पडला तर आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच माजी सैनिकांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थीचा गुणगौरव सोहळा तसेच महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते.
दिव्यातील विविध राजकीय पक्षातील अनेक मान्यवर व सामाजिक संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला. प्रसंगी शिवसेना दिवा शहरप्रमुख तथा मा. उपमहापौर रमाकांत मढवी तसेच विभाग प्रमुख चरणदास म्हात्रे, नगरसेविका दर्शनाताई चरणदास म्हात्रे तसेच साताराचे पुत्र शिवसेना संपर्क प्रमुख आणि ठाण्यातील नगरसेवक शरद कणसे, नगरसेवक दीपक जाधव, विभागप्रमुख उमेश भगत, सुप्रिया आदेश भगत, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवज्योत उत्सव मंडळ दिवा शहर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सव मंडळ यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. प्रसंगी साज महाराष्ट्राचा सांस्कृतिक लाईव्ह ऑर्केस्ट्राने सातारकरांची व मान्यवरांची मनं जिंकली. प्रसंगी संस्थापक राम पवार, अध्यक्ष संतोष फणसे, कार्याध्यक्ष आदित्य कदम, खजिनदार राजेंद्र शेलार, सचिव रामचंद्र पवार, उपाध्यक्ष निलेश पवार, उपकार्याध्यक्ष तान्हाजी पवार, सल्लागार जगनाथ पवार संपर्क प्रमुख दिनकर सपकाळ, संघटक आनंद कोळेकर तसेच सर्व कमिटी सदस्य व सभासद यांनी यावेळी अथक परिश्रम घेत उपक्रम यशस्वी केला.