शिवसेना दिवा शहर आयोजित भव्य दोन दिवसीय आधारकार्ड शिबिराचे आयोजन

संतोष पडवळ (दिवा)
ता २२ फेब्रुवारी 2025
ठाणे : शिवसेना दिवा शहर आयोजित भव्य दोन दिवसीय आधारकार्ड शिबिर आयोजित करण्यात आले असून आधारकार्ड काढणे व बदल करणे शिबीर दिवा शहरातील मुंब्रादेवी कॉलोनी येथील गणपत वारेकर शाळेसमोरील एड. आदेश भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले असून दिवा शिवसेनेकडून शिबिराचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर शिबिरास मा. नगरसेवक दिपक जाधव, भालचंद्र भगत, जगदीश भंडारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.