दिव्यातील अंनत पार्कच्या रहिवाश्यांच्या पाठीशी ठाकरे शिवसेना – दिपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख

संतोष पडवळ (दिवा)
ता २३ फेब्रुवारी 2025
दिव्यातील अंनत पार्कच्या रहिवाश्यांच्या पाठीशी ठाकरे शिवसेना – दिपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख
दिवा आगासन रोडवर १८ वर्षे जुनी असलेल्या अंनत पार्क या इमारतींवर ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभागाची कारवाईची टांगती तलवार असून आज येथील रहिवाश्यांनी ठाणे महापालिकेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत प्रशासन व न्यायव्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. आज दिव्यातील अंनत पार्कच्या रहिवाश्यांच्या पाठीशी ठाकरे शिवसेनेचे दिपेश म्हात्रे ठाणे जिल्हाप्रमुख यांनी असल्याचे स्पष्ट केले. प्रसंगी ठाकरे शिवसेनेचे दिवा शहर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते