ब्रेकिंग : दिव्यातील अशोका इमारतीतील घर शॉर्टसर्किटमुळे आगीच्या भक्षस्थानी ; मोठया प्रमाणात वित्तहानी.

संतोष पडवळ (दिवा)
ठाणे, दिवा : आज दिनांक २४/०२/२०२५ रोजी ०७:५२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार अशोका रेसिडेन्सी, सुजाता हॉटेलच्या जवळ, सद्गुरु नगर, दिवा (पूर्व). या ठिकाणी अशोका रेसिडेन्सी (तळ+०५ मधली इमारत) या इमारतीमधील ‘ए’ विंगच्या पहिल्या मजल्यावरील रूम क्रमांक:-१०६ (मालक:- श्री. शत्रुघ्न वसंत मेस्त्री) या रूममध्ये आग लागली होती.
सदर घटनास्थळी दिवा पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यु वाहनासह व ०१-फायर वाहनासह उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. सदर घटनास्थळी घरामध्ये आग लागल्यामुळे घरातील फ्रिज, कपडे, किचन रूम मधील साहित्य व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाली आहे. सदर घटनास्थळी लागलेली आग ०८:२५ वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.